Wednesday, May 6, 2020

स्वगृही जाण्यासाठी वाहनांना परवानगी देण्यासाठी ‘एसडीओ’ प्राधिकृत

संचारबंदीमुळे अडकलेल्या कामगार, यात्रेकरु, मजूर, नागरिक, विद्यार्थी आदींना स्वगृही परतण्यासाठी परवानगी प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. अशा अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाणा-या वाहनांची परवानगी देण्यासाठी आता उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

 लेबर कॅम्पमधील मजुरांना स्वगृही परतण्यासाठी  त्यांची आरोग्य तपासणी करुन कंत्राटदाराच्या वाहनाने, किंवा स्वतःच्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने सदर नागरिकांना आपल्या मूळ गावी परत पाठविणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनाची परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 

परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँड सॅनिटायझर, वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींची पूर्तता करुनच परवानगी देण्यात यावी. त्याच बरोबर परवानगी देतांना संबधित उपविभागीय अधिकारी यांनी त्या नागरिकांच्या मूळ जिल्ह्याशी संपर्क साधून परवानगीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या आदेशातील सूचनांचे तंतोतंत पालन करुन पासेस निर्गमित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

                                    000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...