Friday, May 22, 2020

कोविड रूग्णालयातून 11 जणांना डिस्चार्ज


अमरावती, दि. 22 : जिल्हा कोविड रूग्णालयातून काल सायंकाळपासून एकूण अकराजणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

आज दुपारपर्यंत सात रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात मसानगंज येथील 35 वर्षीय महिला, खोलापुरी गेट येथील 35 वर्षीय महिला, मसान गंज येथील 38 वर्षीय महिला, मसानगंज येथील 52 वर्षीय महिला, मसानगंज येथील 45 वर्षीय पुरुष, नांदगाव पेठ येथील 60 वर्षीय महिला, परतवाडा येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

त्यानंतर सायंकाळीही चार रूग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात उत्तमनगर येथील 42 वर्षीय महिला, अंबिकानगर येथील 43 वर्षीय पुरुष, बेलपुरा येथील 30 वर्षीय पुरुष व लालखडी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या 76 झाली आहे.

कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी. समाजहित जपण्यासाठी माहिती स्वत:हून देऊन तपासणी करून खातरजमा केली पाहिजे. उपचार घेतले पाहिजेत, असे आवाहन या रूग्णांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह कोविड रूग्णालयातील स्टाफकडून सर्वांचे अभिनंदन करून निरोप देण्यात आला. घरी परतल्यानंतर हे रूग्ण 14 दिवस विलगीकरणात राहणार आहेत.

                                              000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...