Monday, April 5, 2021

 











पालकमंत्र्यांकडून लासूर मंदिराला भेट

प्राचीन वैभवाच्या जतन- संवर्धनासाठी भरीव तरतूद

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 5 : प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. त्याअंतर्गत लासूर येथील शिवमंदिर या प्राचीन वैभवाचे जतन व संवर्धन केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

            दर्यापूर तालुक्यातील लासुर येथील पुरातन शिव मंदिर परिसरातील नागोबा मंदिर ते आनंदेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे लोकार्पण श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, लासूरच्या सरपंच रंजना जाधव, उपसरपंच विजयमाला आठवले, श्रीमती सुरेखाताई ठाकरे,खरेदी विक्री संघाचे गजानन जाधव, सुधाकरराव भारसाकळे, अनिल भारसाकळे, प्रदीप देशमुख, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी केली व या पुरातन मंदिराचा इतिहास, बांधकामाची वैशिष्ट्ये, त्याचे बारकावे आदी माहिती तज्ज्ञांकडून घेतली. पौराणिक महत्ता लाभलेल्या स्थळाचा वारसा जपणे आवश्यक आहे. लासूर येथील शिवमंदिराचे जतन, देखभाल आणि विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मंदिराचे प्राचीन रूप व पावित्र्य जपले जावे यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.  

            लासूर येथे पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. पौराणिक वारश्याच्या जपणुकीसह नागरी सुविधा निर्माण केल्याने रोजगार वाढून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

तज्ज्ञ अनिरुद्ध पाटील, मोहन पवित्रकार, अभियंता संदीप देशमुख, सुनील गावंडे, अमोल जाधव, नितीन पवित्रकार,ईश्वर बुंदेले, संजय देशमुख, अभिजित देवके, दीक्षांत पाटील,शिवाजीराव देशमुख,शिवाजी देशमुख,विजयराव मेंढे,भारतीताई दिलीप गावंडे, संतोष आठवले, दिवाकर आठवले,संजय राऊत, भाऊराव आठवले, गोपाळ देशमुख, शरद ठाकरे आदी उपस्थित होते.

                        00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...