Monday, June 25, 2018

विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज

मुंबईदि. २५ : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांततसेच मराठवाड्यातील हिंगोलीनांदेडपरभणीजालनाऔरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगावअहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होईल. परंतु २९ जूनपासून किमान २ जुलैपर्यंत विदर्भमराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असल्यामुळे तापमानात परत वाढ होईल. शेतकऱ्यांनी ही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन पेरणीचे आणि लागवडीचे नियोजन करावेअसे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मुंबईसह कोकणात देखील या आठवड्यात चांगला पाऊस पडत राहीलअसे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...