Wednesday, June 27, 2018


दिलखुलासमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत गुरुवार दि. 28 जून आणि शुक्रवार दि. 29 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवातत्यामागचा उद्देश व संकल्पनाअभियानाची वैशिष्ट्येमहिलांचे सक्षमीकरणया अभियानाचा फायदा मिळवून घेण्यासाठीचे निकषमहिला व तरूणांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाया अभियानाबद्दल करण्यात आलेली जनजागृती तसेच ऑन अ बॅच’ ही संकल्पना या विषयांची माहिती श्रीमती आर. विमला यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...