Saturday, June 2, 2018

विविध योजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
‘जलयुक्त’सह विविध योजनांची कामे मुदतीत पूर्ण करावी
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
          अमरावती, दि.2 : जलयुक्त शिवार योजना, आवास योजना यासह विविध योजनांची मुदतीत पूर्ण करावी. जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे सांगितले.
          विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी, वन, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
          श्री. पोटे-पाटील म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे जलस्त्रोतांचे पुनर्भरण, पाणी साठा निर्माण होऊन कृषी उत्पादकता वाढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कामे कसोशीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत.  या कामाचे महत्व ओळखून 15 जूनपूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. काही कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या कामांमध्ये कामचुकारपणा किंवा गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. आवास योजनेतही अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घ्याव्यात असेही ते म्हणाले.
          सगळ्या कामांचे जिओ टॅगींग पूर्ण करावे. कुठलेही देयक टॅगींग पूर्ण केल्याशिवाय अदा करु नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
         जलयुक्त शिवार योजनेत 252 गावांमध्ये 4510 कामांपैकी 1324 कामे पूर्ण झाली आहेत. 2950 कामे प्रगतीपथावर आहेत. 
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...