महाराष्ट्राला बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार
नवी दिल्लीदि. 6 : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
          केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात देशात गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस’ (जीइएम) चा प्रभावी वापर करून  उल्लेखनीय कार्यकरणा-या  राज्यांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाच्या सचिव रिता तेवतिया यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाडॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
          केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस’ (जीइएम) च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी व विक्रीसाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. जीइएम च्या माध्यमातून देशातील सरकारी व गैरसरकारी संस्था खरेदी व विक्रीचे व्यवहार करतात. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयासोबत जीइएम या सेवेसाठी सामंजस्य करार केला व या माध्यमातून झालेल्या खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्र देशात बेस्ट बायर्स’ राज्य ठरले आहे.  जीइएम या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात उद्योग क्षेत्रातील खरेदी व विक्रीच्या व्यवहाराला गती आली आहे. तसेचपादर्शक व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती