Saturday, June 30, 2018


वृक्षदिंडीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वृक्ष लागवड मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 30 :  हरित महाराष्ट्रासाठी शासनाची 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम मोलाची ठरणार असून, विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यात  सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.
वनविभागातर्फे  मोहिमेनिमित्त वृक्षदिंडी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ झाली. खासदार आनंदराव अडसूळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपवनसंरक्षक हेमंत मीना आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभी दिंडीचे पूजन करण्यात आले.  त्यानंतर पालकमंत्री श्री. पोटे पाटील व खासदार श्री. अडसूळ यांनी पालखी खांद्यावर वाहून पुढे मार्गस्थ केली. पुढे सुंदरलाल चौक, पोलीस आयुक्त कार्यालय, विद्याभारती महाविद्यालय यामार्गे जात दिंडीचा वन कार्यालयात समारोप झाला.
दिंडीत विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, महिला, अनेक संस्थांचे कार्यकर्ते आदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ असे फलक उंचावत विद्यार्थी उत्साहात घोषणा देत होते.  वन्यप्राण्यांच्या वेशभूषेतही अनेक मुले सहभागी झाली होती.
        मोहिमेचा शुभारंभ उद्या (1 जुलै) रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या उपस्थितीत महादेवखोरी येथील राखीव वनक्षेत्रात होणार आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.




No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...