Thursday, June 14, 2018

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर
मुंबईदि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत शुक्रवार दिनांक १५ जून  रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्याला 720 किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असल्याने राज्यात मत्स्य व्यवसायाला विशेष महत्व आहे. देशात सागरी मासेमारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. मत्स्य विभागांतर्गत राबविण्यात येणारा तलाव तेथे मासळी हा उपक्रममत्स्य विकास धोरण व त्यातील अडचणीमत्स्यविकास विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनामत्स्य बाजार स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नराज्यातील सागरी मासेमारीला चालना देण्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रममत्स्य व्यवसायातील महिलांचे योगदान लक्षात घेऊन महिलांसाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी  योजना याबाबतची  माहिती  श्री. जानकर यांनी  जय महाराष्ट्र  कार्यक्रमातून  दिली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...