Monday, June 25, 2018

युकेचे अर्थमंत्री फिलिप हॅमोंड यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
वाहतुकीमधील नवीन तंत्रज्ञान आणि फिनटेक पॉलिसी यावर झाली चर्चा
मुंबईदि. 25 : एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले युकेचे (युनायटेड किंग्डम) अर्थमंत्री फिलिप हॅमोंड यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीत वाहतुकीमधील नवीन तंत्रज्ञान आणि फिनटेक पॉलिसी यावर चर्चा झाली.
यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैनमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव युपीएस मदानमुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांच्यासह युके आणि महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेयुके व महाराष्ट्रामध्ये संबंध चांगले आहेत. युकेला भेट देऊन तेथील वाहतूक आणि फिनटेक उद्योगस्नेही प्रणाली (फिनटेक इकोसिस्टम) पाहिली आहेती अत्यंत उत्कृष्ट आहेअशीच उद्योगस्नेही प्रणाली मुंबईत आणायची असून यात युकेची मदत हवी आहे. या प्रणालीद्वारे 150 मिलियन नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. युकेने युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे. फिनटेकमुळे महाराष्ट्राची उद्योगस्नेही प्रणालीची गरज पूर्ण होणार असून यासाठी फिनटेकबरोबर काही सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
श्री. फिलीप म्हणालेभारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युकेला भेट देऊन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होतीत्यानुसार आम्ही प्रथम मुंबईला पसंती दिली आहे. युके आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये अनेक तांत्रिक सहकार्य करार करायचे आहेत. ग्लोबल फिनटेक सेंटर हे मुंबईमध्ये फिनटेक उद्योगस्नेही प्रणाली विकसित करण्यास प्राधान्य देणार आहे. शिवाय वाहतुकीमधील नवनवीन तंत्रज्ञान आणि वाहतूक यामध्ये विकास घडवून आणायचा आहे. फिनटेक उद्योगस्नेही प्रणालीच्या क्षेत्रात 40 टक्के नोकऱ्या उपलब्ध आहेत. गरजेनुसार आम्ही कौशल्य प्रशिक्षण देणार आहोत.
श्री. फिलीप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युके भेटीसाठीचे निमंत्रण दिले.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...