बडनेरा येथील रेल्वे कोच कारखाना
सुरू करण्याच्या कार्याला गती मिळणार
                                                                        - प्रवीण पोटे-पाटील
नवी दिल्ली 18 : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे कोच कारखाना सुरू करण्याच्या कार्याला गती मिळणारअसल्याची माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.
येथील परिवहन भवनात आज विदर्भातील रखडलेल्या कामांचा आढावा बैठक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत झाली. याबैठकीस केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयलकेंद्रीय सरंक्षण राज्य मंत्री सुभाष भामरेअमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटीलआमदार सुनील देशमुखवरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बडनेरा येथील रेल्वे कोच कारखाना उभारण्याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आलेले आहे. या ठिकाणाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ला मंजूरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला गती मिळावीयासंदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच रेल्वे कोच कारखान्याचे काम सुरू करण्यात येईलअसे आश्वसन रेल्वे मंत्री श्री गोयल यांनी या बैठकीत दिले.
अमरावतीतील मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारणार
संरक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकरचउभारण्यात येईलअसे आश्वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज दिले.
        आज केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अमरावती येथील प्रस्तावित मिसाईल कारखान्याची कंपाऊंड वॉल लवकर उभारण्याविषयी बैठकीत निश्चित झाले.
या भागात हा संरक्षण विषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पासाठी कौशल्य आधारित मनुष्यबळाची  आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे कौशल्य विकासाची काम तातडीने सुरू करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले. या कारखाण्यातून कमी अंतराच्या मार करू शकणा-या  क्षेपणास्त्रांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालटास मदत होईल.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले काम लवकर सुरू करावे : गडकरी
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी येथील लष्करी छावणी परीसरातील रखडलेले काम लवकर सुरू करावेअसे निर्देश केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले.
        नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून कामठी येथील लष्करी छावणी परिसरातून हा महामार्ग निघतो. हा परिसर संरक्षण विभागाच्या अंतर्गत येतो. या परिसरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी होत आहेत. पुढील काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या परिसरातील काम सुरू व्हावेतयाबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीअंती  कामठीतील लष्करी छावणी परिसरातील काम सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री यांनी संबधितांना दिले.
००००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती