दिलखुलास कार्यक्रमात युपीएससीत
राज्यात प्रथम आलेले डॉ. गिरीश बदोले
मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत (युपीएससी) राज्यातून प्रथम स्थान पटकाविणारे डॉ. गिरीश बदोले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 15 आणि शनिवार दि. 16 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका तेजस्विनी मुंढे यांनी ही मुलाखत  घेतली  आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आल्याचा अनुभव, युपीएससी परीक्षा मराठी माध्यमातून देताना मराठी माध्यमांच्या पुस्तकांची उपलब्धतापरीक्षेची तयारी कधी करावीया परीक्षेत महाराष्ट्राच्या यशाचा उंचावलेला आलेख तसेच आता उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणार आदी विषयांची माहिती डॉ. बदोले यांनी दिलखुलास मध्ये चर्चा करताना दिली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती