Monday, June 18, 2018

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात
आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई
            मुंबईदि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १९ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीचे प्रकारराज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपत्तीशी मुकाबला करण्याची पूर्वतयारीअतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची सावधगिरीविभागाद्वारे राबविण्यात येणारे प्रशिक्षण व जनजागृती अभियानआपत्तीमध्ये अडकलेल्यांना शोधण्याची कार्यप्रणालीआपत्तीच्या कालावधीत माध्यमांची भूमिका आदी विषयांची माहिती श्री. देसाई यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...