Saturday, June 30, 2018

पालकमंत्र्यांकडून कृषी विभागाचा आढावा

अमरावती, दि. 28 :  खरीप हंगाम लक्षात घेता शेतक-यांना बियाणे, खत, आवश्यक साधने मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.   
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, कृषी सहसंचाक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते. 

     श्री. पोटे पाटील म्हणाले की, खरीपासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणारी जे-एस 335 वाणाचे सोयाबीन बियाणे आदी सामुग्री तत्काळ मिळाली पाहिजे.  बियाण्याची अतिरिक्त 10 हजार क्विंटर मागणीही महाबीजकडे नोंदवली आहे. त्यामुळे ते सर्वत्र उपलब्ध असण्याची दक्षता घ्यावी. सर्व दुकानांची कसून तपासणी करावी व विक्रेत्यांकडून गैरप्रकार घडल्यास तत्काळ कारवाई करावी. स्थानिक परिस्थितीबाबत तालुका अधिकारी व कृषी सहायक यांच्याकडून वेळोवेळी माहिती घ्यावी. विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीत कुठलीही अडचण आल्यास ती तत्काळ दूर व्हावी. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पेरणीबाबत उचित मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले.
00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...