Monday, June 25, 2018

कोरियन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे चे काम गतीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबईदि. 25 : एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले साऊथ कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे चे काम अत्यंत गतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कोरियन शिष्टमंडळाला दिले.
बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैनमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव युपीएस मदानमुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार उपस्थित होते. शिष्टमंडळात साऊथ कोरियाचे मुंबईतील कौन्सल जनरल सौंजेन कीमविकास वित्त केंद्राचे महासंचालक तैसिक युनएशियन पायाभूत गुंतवणूक बँकेचे संचालक नॅमसंग किमसेंगयंग छोई यांचा समावेश होता. बैठकीत मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे बाबत चर्चा झाली. कोरियन कंपनी या मार्गाचे काम करणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई-नागपूर एक्सप्रेस वे हा सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जगातील एकमेव व्हावा. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहेपण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहेकाम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ज्ञांनी पाहणी करावी. महामार्ग आणि रस्ते सुरक्षा याबद्दलच्या तंत्रज्ञानावरही अधिक भर द्यावा. रस्त्यामधील स्मार्ट घटक आणि स्मार्ट तंत्रज्ञानालाही प्राधान्य द्यावेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.
महात्मा गांधी आमचे राष्ट्रीय आदर्श तर आहेतचत्यांनी स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठे योगदान दिले. जगात शांतताअहिंसा प्रस्थापित करण्यास त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले
ह्युंग क्वान को म्हणालेमी भारतात पहिल्यांदाच आलो असून महात्मा गांधी यांच्याबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पात तंत्रज्ञानाची मदत व आर्थिक सहयोग द्यायचा आहे.
10 बिलियन डॉलर एक्सप्रेस वे विकास संस्थेसाठी आणि 9 बिलियन डॉलर एक्स्पोर्टवर खर्च करण्याची तयारी त्यांनी यावेळी दाखविली.
स्मार्ट आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे चे काम त्वरित व गतीने करण्याची ग्वाही कोरियन शिष्टमंडळाने यावेळी दिली.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...