Saturday, June 30, 2018

एव्हरेस्ट मोहिमेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक
मुंबईदि. 29 : मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्री मोदी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांचे अनुभव ऐकून भविष्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते.
राज्यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटकपणा व साहसीवृत्तीला वाव मिळावा यासाठी 'मिशन शौर्य'ची आखणी करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत विकास सोयामशुभम पेंदोरउमाकांत मडावीछाया आत्रामइंदू कण्णकेमनीषा धुर्वेआकाश आत्रामकविदास काटमोडेआकाश मडावी आणि प्रमेश आळे या मुलांनी एव्हरेस्टवर चढाई केली होती. या मोहिमेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच कौतुक केले होते. आज या विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरआदिवासी विकास मंत्री विष्णू सवराआदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्माचंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यानया भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. विशेषतः भारतनेट प्रकल्पांतर्गत महानेट हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा कसा बदलता येईल याबाबतचे पत्रही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...