रोजगाराबरोबरच मानव संसाधन निर्मिती
सारथीच्या माध्यमातून निश्चित होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणेदि. 26 :  छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थातसारथी’ ही संस्था निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल आणि रोजगाराबरोबरच मानव संसाधनाची निर्मिती करेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
सेनापती बापट मार्गावरील बालचित्रवाणीच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर सिंबायोसिसच्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलअन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकसारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेखासदार अनिल शिरोळेआमदार जगदीश मुळीकआमदार गौतम चाबुकस्वारआमदार भीमराव तापकीरआमदार विजय काळेपुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमालेसामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारेसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकरबार्टीचे महासंचालक कैलास कणसेसारथी समितीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहारसदस्य सचिव उमाकांत शेरकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआयएसएसएमएस कॅम्ससमधील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपल्या संस्थानामध्ये वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेशिक्षण आणि रोजगार हेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठीचे महत्वाचे घटक आहेत. मानवसंसाधन आणि ज्ञान हेच 21व्या शतकाचा मंत्र असून मराठा समाजाला मानव संसाधनात परावर्तीत करण्यासाठीच सारथीची निर्मिती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेमहाराष्ट्राच्या जडण-घडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. एका बाजूला राज्यकर्ता समाज आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा मोठा वर्ग आर्थिक आणि सामाजिक रुपाने मागासलेला आहे. त्यामुळेच समाजात अस्वस्थता असणे हे स्वाभाविक आहे. मराठा समाजात शिक्षण,रोजगार रूजत नाहीसमाज नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीतोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाची निर्मिती केली. न्यायमूर्ती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहेमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शिक्षण आणि रोजगार हेच आरक्षणाचे उद्दिष्ट असतेसारथीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून अनेक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारावर भर देण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरूज्जीवन राज्य शासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले.  
शाहू महाराजांच्या स्वप्नातील युवक घडविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकामुळे जगभरात भारताची नवी ओळख निर्माण होईल. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडाची पुननिर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना एकत्र करून पुढे जाण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातील समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न राहीलअसा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणालेमराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्व जिल्ह्यात शासकीय वसतिगृह निर्माण करण्यात येत आहे. मराठा समाजाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री मंडळाच्या उपसमितीची निर्मिती करण्यात आली आहे. या उपसमितीला निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेमराठा समाजाच्या हितासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या जयंती दिनी ही संस्था कार्यान्वित होत आहेयाचा अधिक आनंद आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणालेसारथी संस्थेची उद्दिष्टेही छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत होती.  बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका सारथीच्या माध्यमातून राज्य शासनाने घेतली आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मराठा समाजाचे प्रश्न कालबध्द पध्दतीने सोडवावेतअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
            यावेळी प्रास्ताविक भाषणात डॉ. सदानंद मोरे म्हणालेमराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सारथी संस्था राज्य शासनाने स्थापन केली आहे. कुणबीमराठा आणि शेतकरी समाजाची सामाजिकआर्थिक उन्नत्ती करण्यासाठी ही संस्था कायम कटीबध्द राहील.
यावेळी सारथी संस्थेच्या निर्मितीची आणि उद्दीष्टांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. उपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी मानले.
सारथी : ठळक वैशिष्ट्ये -
·         मैसूर येथील कुशल कारागिरांनी बनविलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काष्टशिल्पाचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले.
·         सारथी संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले.
·         सेनापती बापट रोडपुणे येथील 'बालचित्रवाणीइमारतीमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कार्यालय कार्यान्वित.
·         इमारतीचे क्षेत्रफळ - सुमारे 392 चौरस मीटर.
·         दुमजली इमारत - दोन्ही मजल्यावर प्रत्येकी 11 खोल्या म्हणजेच एकूण 22 खोल्या.
·         इमारतीत 30 ते 35 आसनक्षमतेचे सभागृहव्यवस्थापकीय संचालकनिबंधक यांचा कक्षसंगणक कक्षग्रंथालय व स्वच्छतागृहांची सोय.
·         एकूण 100 कर्मचारी व अधिकारी यांची बैठक व्यवस्था.
·         सारथी संस्थेमार्फत मराठाकुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी या समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांना एम.फील व पीएचडी साठी शिष्यवृत्ती देण्यात येणार.
·         विद्यार्थ्यांना एमपीएससीयूपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत मोफत देण्यात येणार.



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती