Friday, January 13, 2023

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ छाननी प्रक्रियेत ३३ उमेदवारांचे अर्ज वैध

 




अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ

छाननी प्रक्रियेत ३३ उमेदवारांचे अर्ज वैध

 

अमरावती, दि. १३ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्राप्त अर्जांनुसार छाननी प्रक्रिया आज झाली.  अर्ज करणा-या ३४ उमेदवारांपैकी  ३३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध असल्याने स्वीकृत करण्यात आली. एका उमेदवाराचे वय ३० वर्षांहून कमी असल्याने अर्ज फेटाळण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयात छाननी प्रक्रिया झाली. निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.

छाननी प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांकडून ४४ अर्ज प्राप्त होते. गजानन नेहारे यांचे वय ३० पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आले.

अर्ज स्वीकृत झालेल्या उमेदवारांची नावे अशी : गोपाळ सुखदेव वानखेडे, पांडुरंग तुकाराम ठाकरे, अरूण रामराव सरनाईक, किरण अर्जुन चौधरी, संदेश रणवीर, प्रा. डॉ. प्रफुल्ल अजाबराव राऊत, शरद झांबरे, श्याम जगमोहन प्रजापती, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, माधुरी अरूणराव डहारे, धनराज किसनराव शेंडे, मीनल सचिन ठाकरे, मधुकर दिगांबर काठोळे, आनंद रविंद्र राठोड, राजेश सोपान गावंडे, डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी, अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, संदीप बाबुलाल मेश्राम, उपेंद्र बाबाराव पाटील, लक्ष्मीकांत नारायण तडसे, नामदेव मोतीराम मेटांगे, डॉ. गौरव रामदास गवई, अनिल ओंकार अमलकार, धीरज रामभाऊ लिंगाडे,  भारती दाभाडे, प्रवीण डिगांबर बोंद्रे, नीलेश दीपक पवार, सुहास विठ्ठलराव ठाकरे, विकेश गोकुलराव गवाले, ॲड, सिद्धार्थ गायकवाड, राजेश मोतीराम दांदडे.  

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...