खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत

 खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी

ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत

 

अमरावती, दि. 9 : उद्योजक, आस्थापना यांनी त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे. सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर विहित कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा ऑनलाईन मिळण्यासाठी www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

उद्योजक, आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. डिसेंबर 2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिकासाठी ई-आर-1 या प्रपत्राची माहिती उपरोक्त संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगइन करुन ऑनलाईन सादर करावे. व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावे.

ऑनलाईन ई-आर-1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती