महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीच्या अर्जांची त्वरित पूर्तता करावी

 महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 

शिष्यवृत्तीच्या अर्जांची त्वरित पूर्तता करावी

अमरावती, दि. 10 : सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्याक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, या योजना राबविण्यात येतात.

या योजनांचे सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण  9 हजार 48 व सन 2021-22 या वर्षातील 1 हजार 241 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. परंतु अद्यापही संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजूरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर केले नाहीत. यामध्ये श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती, तक्षशिला तंत्रनिकेतन, अमरावती, आरडीआयके महाविद्यालय, बडनेरा, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, वरुड, भारतीय महाविद्यालय, अमरावती, जे.डी. पाटील भारतीय महाविद्यालय, अमरावती, प्रबोधन भारतीय महाविद्यालय, दर्यापूर तसेच श्रीमती कोकिळाबाई गावंडे महाविद्यालय, दर्यापूर या महाविद्यालयाचे अर्ज मोठ्या प्रमाणात महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. 

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्रचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगइनवर पाठवावे. तसेच विद्यार्थी लॉगइन त्रुटी पुर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत त्रुटीपूर्तता करुन पात्र अर्ज जिल्हा लॉगइनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती