अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन

 





अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन

 

       अमरावती, दि. 18 : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान दि. 30 जानेवारीला विभागातील 262 मतदान केंद्रावर होणार आहे. तसेच निवडणुकीची मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी, रोजी बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी उमेदवारांची बैठक घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

 

       सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, उपायुक्त विजय भाकरे, तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी बैठकीला उपस्थित होते.

 

         निवडणुकीच्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत यावेळी संबंधितांना माहिती देण्यात आली. मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र उदा. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना इ. तसेच पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर छायाचित्र असणे आवश्यक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास त्यासंदर्भात तीनवेळा वृत्तपत्रातून व स्थानिक टि.व्ही चॅनल्सवर प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या सुलभतेने मिळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथून उमेदवारांना आवश्यक परवानग्या घेता येतील. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे प्रचाराची वेळ ही रात्री दहापर्यंतच अनुज्ञेय आहे, असे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

 

         निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रतिनिधी तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार प्रतिनिधी व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याची उमेदवारांना मुभा असेल. त्यासाठी विहित नमून्यातील अर्ज सादर करुन त्यांची नेमणूक करता येईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

       निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदान पद्धतीबाबतही त्यांनी माहिती दिली. विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती