जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत 11 फेब्रुवारीला लोकअदालत

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत 11 फेब्रुवारीला लोकअदालत

अमरावती, दि. 2 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, तसेच राज्य प्राधिकरणाच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्यात दाखल व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.

             लोकअदालतीत अर्ज करणा-यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. पक्षकारांनी आपले तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालतीसमक्ष तडजोडीने व समंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाकडे संपर्क साधावा. पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन राष्ट्रीय लोकअदालतीसमक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर तसेच सचिव जी.आर. पाटील यांनी केले आहे.

*****

--

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती