Tuesday, January 10, 2023

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरावे

 विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 

शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरावे


अमरावती, दि. 10 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुक्रमे विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येतात.

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी शासनाचे http://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित आहे. 

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे आवेदनपत्रे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यासाठी महाविद्यालयस्तरावर नवीन नुतनीकरणाची आवेदनपत्र वेळीच नोंदणीकृत करुन नोंदणीकृत झालेल्या अर्जाची नियमानुसार पडताळणी, तपासणी करुन अंतिम मंजुरीसाठी या कार्यालयाच्या लॉगइनवर पाठविण्यात यावे. अशा अर्जास अंतिम मंजूरी करुन राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या रकमेची अदायगीची पुढील प्रक्रिया राज्यस्तरावरुन होऊ शकेल. 

महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर भरुन घेण्याची तात्काळ कार्यवाही करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेश घेतलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावरुन तात्काळ ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...