Thursday, January 19, 2023

पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2023 मदतनीसाची आवश्यकता असल्यास 26 जानेवारीपूर्वी अर्ज सादर करावा

 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2023

मदतनीसाची आवश्यकता असल्यास

26 जानेवारीपूर्वी अर्ज सादर करावा

 

       अमरावती, दि. 18 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2023 मध्ये अंध व निश:क्त मतदाराव्यतिरिक्त इतर कोणालाही मतदान केंद्रात सहाय्य करण्यासाठी मदतनीसाची परवानगी नाही. जर अंध व निश:क्त मतदाराला मदतनीसाची आवश्यकता असेल तर त्यांनी मतदानाच्या तीन दिवस अगोदर म्हणजे दि. 26 जानेवारी, 2023 पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत कळविणे आवश्यक आहे.

          मदतनीसाच्या परवानगीसाठी अंध व निश:क्त मतदाराने आपले अर्ज विहित नमुन्यात उपजिल्हाधिकारी भूसंपादन, क्रमांक 4 तथा नोडल अधिकारी, टपाली मतपत्रिका यांच्या कार्यालयात दि. 26 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...