Thursday, January 26, 2023

आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स

 



आदिवासींव्दारे निर्मित उत्पादनांच्या विक्री केंद्र ‘आदिहाट’ चे थाटात उद्घाटन

हस्तकला, बांबुकला, चित्रकला व खाद्यपर्दांचे विविध विक्री स्टॉल्स



      अमरावती, दि. २६ : आदिवासी समाज हा राज्याच्या विविध डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वास्तव्य करतो. त्यांची स्वतंत्र अशी संस्कृती असून ती संपन्न आणि समृध्द आहे. तसेच त्यांची जीवनशैली सुध्दा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तीचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 

आदिवासी समाजातील व्यक्तींच्या उपजत कौशल्याला प्रामुख्याने हस्तकला, बांबुकला, चित्रकला इत्यादी तसेच  आदिवासी भागात उत्पादीत रानमेवा, वनौषधी, कृषी उत्पादने, विशिष्ट खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी हक्काचे ठिकाणी मिळावे, यासाठी ‘आदिहाट’ ही संकल्पना आदिवासी विकास मत्र्यांच्या संकल्पनेतून विभागात राबविली जात आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर येथील अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘आदिहाट’ या विक्री केंद्राचे आज अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


           यावेळी जात पडताळणी समितीच्या सह-आयुक्त प्रिती बोंद्रे, अमरावती, उपायुक्त (आदिवासी विकास) जागृती कुमरे, पोलीस निरिक्षक श्री. पाटील, सेवानिवृत्त उपायुक्त श्री. राघोर्ते, सहाय्यक आयुक्त (लेखा) प्रविण इंगळे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) शिवानंद पेढेकर, सहाय्यक आयुक्त (शिक्षण) संजय ससाने, वरिष्ठ संशोधन अधिकारी प्रिती तेलखडे यांच्यासह अपर आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच आदिवासी बांधव व विद्यार्थी आदी उपस्थित होते. 


        या ‘आदिहाट’मध्ये वरुड येथील आदिवासी कारागिर मिथुन आहाके यांनी बनविलेल्या अत्यंत आकर्षक लाकडी शोभेच्या वस्तु तसेच मेळघाटातील दुणी गावाच्या बचतगटांमार्फत नैसर्गिक व सेंद्रिय पध्दतीने पिकविलेले कृषी उत्पादने, हस्तकलेच्या वस्तु, आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध शिल्प, कलाकुसरीच्या वस्तु, दाग-दागीने व महादेव खोरी येथील बचतगटांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉल लावण्यात आले होते. 

या ‘आदिहाट’ विक्री केंद्रावर आदिवासी कलाकार, बचत गटांनी वस्तू विक्रीकरिता आणाव्यात तसेच या स्टॉलवर विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी करुन आदिवासी विक्रेत्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन अपर आयुक्त श्री. वानखडे यांनी याप्रसंगी केले.  


        0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...