Tuesday, January 10, 2023

सहकार विभागातील जी.डी.सी. ॲन्ड अे परीक्षा वेळापत्रक जाहीर परीक्षेचा कालावधी 26 ते 28 मे दरम्यान

 सहकार विभागातील जी.डी.सी. ॲन्ड अे परीक्षा वेळापत्रक जाहीर

 परीक्षेचा कालावधी 26 ते 28 मे दरम्यान

अमरावती, दि. 10 : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड अे बोर्ड) मार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड अे) व सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी.एच.एम परीक्षा दि. 26,27 आणि 28 मे 2023 रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावा. 

ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सविस्तर सुचना खात्याच्या http:gdca.maharashtra.gov.in व http:sahakarayukya.maharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. केवळ ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज भरताना तयार केलेल्या स्वत:च्या युझर आयडी व पासवर्ड परीक्षार्थींनी परीक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. या परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. 

शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी विषय क्रमांक 1 - सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन (मॅनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटी), गुण 100, वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत राहील.

शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी विषय क्रमांक 2  - जमाखर्च (अकाउन्ट्स), गुण 100, वेळ दुपारी 2 ते 5 पर्यंत राहील. 

शनिवार, दि. 27 मे 2023 रोजी विषय क्रमांक 3 - लेखापरीक्षण (ऑडिटिंग), गुण 100, वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत राहील. 

शनिवार, दि. 27 मे 2023 रोजी विषय क्रमांक 4 - सहकाराचा इतिहास, तत्त्वे व व्यवस्थापन (हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲन्ड मॅनेजमेंट इन को-ऑपरेशन), गुण 100, वेळ दुपारी 2 ते 5 पर्यंत राहील.

रविवार, दि. 28 मे 2023 रोजी विषय क्रमांक 5 - सहकार कायदा व इतर कायदे (को-ऑपरेटिव्ह लॉज अदर लॉज), गुण 100, वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत राहील.

रविवार, दि. 28 मे 2023 रोजी विषय क्रमांक 6 - सहकारी बँक, संस्था व इतर वित्तीय संस्था (को-ऑपरेटिव्ह बँकिंग ॲन्ड क्रेडीट सोसायटीज), गुण 100, वेळ दुपारी 2 ते 5 पर्यंत राहील, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी कळविले आहे. 

***

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...