महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयासाठी भाडे तत्वावर इमारतीसाठी निविदा आमंत्रित

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयासाठी भाडे तत्वावर इमारतीसाठी निविदा आमंत्रित


        अमरावती, दि. 10 (विमाका)  : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयाला सर्व सोयींयुक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इमारतची आवश्यकता असून 11 जानेवारीपर्यंत इच्छुकांनी दरपत्रक (निविदा) कार्यालयास सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमारतीमध्ये पुढीलप्रमाणे बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे.


इमारतीचे बांधकाम अंदाजे एक हजार ते दोन हजार चौ.फुट चटई क्षेत्र असावे. इमारतीच्या बांधकामाला 40 वर्षापेक्षा अधिक झालेले नसावे. इमारतीमध्ये स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटरसह विद्युत पुरवठा असणे आवश्यक असून मुबलक पाणी पुरवठ्यासह बारा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. (बोअरवेल, विहीर, प्राधिकरणाचे नळ इत्यादी पैकी कोणतेही एक) शासकीय वाहनाकरीता पार्कींगसाठी जागा असावी. उपरोक्त बाबींची पूर्तता होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या इमारतीस प्राधान्य देण्यात येईल, असे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी कळविले आहे.


तरी इच्छुकांनी दि. 6 ते 11 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरपत्रक सादर करावे. याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाचे नोटीस बोर्डवरील विस्तृत जाहिरात पहावी, असे श्री. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


           00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती