‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 






‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत

सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 

अमरावतीदि.26: ‍‍प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते.

मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व  विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात  एकूण 17 पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.   

राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली.

स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जिजाबाई गाईड पथक तसेच स्वामी विवेकानंद स्काऊट पथक, केम्ब्रिज इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल, दिपा इंग्लिश प्रायमरी स्कुल, अस्मिता विद्यालय यांचे स्काऊट गाईड यांनी आकर्षक पथसंचलन करुन मोठी दाद मिळविली. पथसंचलनामध्ये पोलिस विभागाचे श्वानपथक आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. यावेळी श्वानाने सलामी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.  महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला शक्तीचा जागर करणारा देखावा लक्षवेधी ठरला.

जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, मनपा अग्निशामक वाहन तसेच बुलेट दुचाकी, दंगा नियंत्रण पथक ‘वज्र वाहन’, ‘वरुण वाहन’,  मनपा आरोग्य विभागाचे वाहन, परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारी एसटी बस, जिल्हा आरोग्य रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक संचालनात सहभागी होते.

000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती