अंतरिम आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

 


















अंतरिम आकडेवारीनुसार

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

 

     अमरावती, दि. 30 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान झाले. याबाबत मतदान पथकांच्या नोंदी व दस्तऐवज यांच्या संपूर्ण तपासणीअंती अंतिम आकडेवारी जाहीर होईल. या आकडेवारीत काहीसा बदल संभवतो.

या निवडणूकीत एकूण 23 उमेदवार निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 5.49 टक्के मतदान झाले.

सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्रावर 4.25 टक्के, अकोला जिल्ह्यात 61 मतदान केंद्रावर 5.53 टक्के, बुलडाणा जिल्ह्यात 52 मतदान केंद्रावर 6.38 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 48 मतदान केंद्रावर 5.78 टक्के, वाशिम जिल्ह्यात 26 मतदान केंद्रावर 7.42 टक्के मतदान झाले.

दुपारी 12 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 13.69 टक्के, अकोला जिल्ह्यात 14.65 टक्के, बुलडाणा  जिल्ह्यात 17.89 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 18.07 टक्के तर वाशीम 19.39 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 15.94 टक्के मतदान झाले.

दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 26.15 टक्के, अकोला जिल्ह्यात 28.45 टक्के, बुलडाणा  जिल्ह्यात 33.47 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 35.60 टक्के तर वाशीम जिल्ह्यात 34.37 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये 262 मतदान केंद्रावर सरासरी 30.40 टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

 

दुपारी 4 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात 43.37, अकोला जिल्ह्यात 46.91, बुलडाणा जिल्ह्यात 53.04, वाशिम जिल्ह्यात 54.80, यवतमाळ जिल्ह्यात 58.87 असे एकूण 49.67 टक्के अंदाजे मतदान झाले. 

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती