सहकारी व्यवस्थापन पदविकेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

 सहकारी व्यवस्थापन पदविकेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 : सहकारी व्यवस्थापन पदविकेचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम राज्य सहकारी संघातर्फे चालवला जात असून, त्यासाठी इच्छूकांनी दि. ३१ जानेवारीपूर्वी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 सहकारी संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे सहकारी व्यवस्थापन पदविका (डीसीएम) असणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांमध्ये नोकरी करणा-यांना कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा आणि सुशिक्षीत बेरोजगारांना  संस्थांमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी सहकारी संघातर्फे हा अभ्यासक्रम दूरस्थ ‍शिक्षण (पोस्टल) पद्धतीने सुरू आहे. राज्य सहकारी संघ ही सहकार शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार व प्रसिध्दीचे कामकाज करणारी राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे 103 वर्षापासून 13 सहकार प्रशिक्षण केंद्रे व 33 जिल्हा सहकारी बोर्डांमार्फत सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्य अविरत सुरू आहे.

पदविका मिळविण्यासाठी अमरावती विभागातील इच्छूकांनी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र व त्याअंतर्गत अमरावती व यवतमाळ येथील जिल्हा सहकारी बोर्डाशी संपर्क साधावा. 


000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती