जिल्हाधिका-यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

 



जिल्हाधिका-यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

 

अमरावती, दि. १९ : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिका-यांनी परस्पर समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिली.

 

निवडणूकीसाठी नियुक्त नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा महसूलभवनात आढावा घेताना त्या बोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी मनीषकुमार गायकवाड, रणजीत भोसले, सुभाष दळवी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वानखडे,  जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, सहायक नगर प्रशासन आयुक्त गीता वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तहसीलदार उमेश खोडके आदी उपस्थित होते.

 

मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करावी. मतदान केंद्र व्यवस्थापन कक्ष, वेबकास्टिंग, दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक तिथे व्हीलचेअर, रॅम्प, कोविड प्रतिबंधक नियमावलीनुसार सॅनिटायझर आदी सर्व व्यवस्था ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी खातरजमा करावी. कुठेही काही अडचण येत असल्यास तत्काळ निदर्शनास आणून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी दिले.

 

टपाली मतपत्रिका, आदर्श आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, वाहतूक नियोजन आदी विविध कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.

 

00000

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती