मकरसंक्रांतीला साजरा होणार पौष्टिक तृणधान्य दिन

 मकरसंक्रांतीला साजरा होणार पौष्टिक तृणधान्य दिन

अमरावती, दि. 12 : कृषी विभागामार्फत यंदा ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा’निमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांतर्गत मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

     या दिनाचे औचित्य साधून कृषी सहायक आपल्याकडील गावांमध्ये कृषी प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करतील. तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांची लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनविण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहितीही  नागरिकांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहारतज्ज्ञ, विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. मकर सक्रांत-भोगी हा दिवस जिल्ह्यात ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती