Thursday, January 19, 2023

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषा विभागातर्फे विद्यापीठात प्रा. फाळके यांचे आज व्याख्यान

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मराठी भाषा विभागातर्फे विद्यापीठात प्रा. फाळके यांचे आज व्याख्यान


अमरावती, दि. १९ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार, दि. 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता मराठी विभाग येथे प्रा.भगवान फाळके यांचे 'मराठी साहित्यात अमरावती जिल्ह्याचे वाङ् मयीन योगदान' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 


प्रा. भगवान फाळके हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रामध्ये सहायक प्राध्यापक असून मराठी साहित्याचे अभ्यासक आणि कवी अशी त्यांची ओळख आहे. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे असतील.

          मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला दि. 14 जानेवारीपासून सुरुवात झाली असून तो दि. 28 जानेवारीपर्यंत साजर करण्यात येणार आहे. यानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्व भाषा व साहित्यप्रेमींनी लाभ घेऊन मायमराठीच्या जागरात सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी केले आहे.

          भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावतीचे अध्यक्ष विलास मराठे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहील.

0000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...