पोलिओ निर्मूलन मोहिमेत जिल्ह्यात 19 जानेवारीला लसीकरण



अमरावतीदि. 7 – जिल्ह्यात 19 जानेवारीला पोलिओ निर्मूलन मोहिमेत लसीकरण मोहिम 19 जानेवारीला राबविण्यात येणार असूनत्यापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी कार्यक्रमाची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावीअसा निर्णय जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
          जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक गजेंद्र मालठाणेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रमणलेसमितीचे सदस्य सचिव तथा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकरजि. प. महिला व बालकल्याण प्रशासन अधिकारी संजय अंबुलकरमहावितरणचे उपअभियंता संजय अंबुलकरजिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवारपोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
          अधीक्षक श्री. मालठाणे म्हणाले कीपोलिओ निर्मूलन मोहिमांची सतत अंमलबजावणी केल्यामुळे पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात देशाला यश मिळाले आहे.  जिल्ह्यात ही मोहिम अधिक व्यापकपणे राबवावी. एकही बालक वंचित राहता कामा नये. एकही वाडी-वस्ती मोहिमतून सुटता कामा नये. गत मोहिमेत नागरी क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण  क्षेत्रातील लसीकरणाचे प्रमाण अधिक होते. यावेळी नागरी क्षेत्रातही अधिक नियोजनपूर्वक काम करावे. मोहिमेची सर्वदूर प्रसिद्धी करण्यात यावी.
                             पोलिओ केवळ पाक व अफगाणिस्तानात शिल्लक
          अफगाणिस्तान व पाकिस्तान वगळता पोलिओचे जगातून समूळ उच्चाटन झाले आहे. 2019 या वर्षात पाकिस्तानात 101 व अफगाणिस्तानात 24 पोलिओच्या केसेस आढळून आल्या. भारतात 2011 मध्ये बिहारमध्ये शेवटची केस आढळली होती. महाराष्ट्रात 2010 नंतर पोलिओची केस आढळली नाही. अमरावती जिल्ह्यात 2007 मध्ये शेवटची केस आढळली होती. भारतात पोलिओ निर्मूलन मोहिमेला चांगले यश मिळाले आहे. तथापिदक्षता म्हणून हा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहेअसे फोर्सचे सदस्य सचिव डॉ. करंजेकर यांनी सांगितले.
गत मोहिम 10 मार्च 2019 ला राबविण्यात आली. त्यात ग्रामीण भागात 93 टक्केतर शहरी भागात 72 टक्के असे जिल्ह्यात सरासरी 89 टक्के लसीकरण झाले.
                             मोहिमेत 19 जानेवारीला जिल्ह्यात ग्रामीणमध्ये 1759 व शहरी क्षेत्रात 200 असे एकूण 1959 बुथ असतील. सुमारे पावणदोन लाख बालकांचे लसीकरण केले जाईल. त्याशिवायग्रामीण भागात 3 दिवस व शहरी क्षेत्रात 5 दिवस गृहभेट देऊन लसीकरण केले जाईल. वाड्यावस्त्यांसाठी स्वतंत्र पथकेही नेमण्यात आली आहेतअसे डॉ. करंजीकर म्हणाले.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती