Saturday, January 25, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण







अमरावती, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज सकाळी झाले.सोहळ्यात प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले.  जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. 
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, स्नेहल कनिचे, शरद पाटील, मनीष गायकवाड, राम लंके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर,अधीक्षक गजेंद्र मालठाणे,  विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पालकमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद माळवे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...