Thursday, January 2, 2020

‘आयटीआय’मध्ये क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ तणावमुक्तीसाठी नियमित खेळ आवश्यक - प्राचार्य अंजली ठाकरे








अमरावतीदि. 2 – धकाधकीच्या आजच्या जीवनात तणावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकात व्यायामखेळांचा समावेश असला पाहिजे. खेळांतून शरीर सुदृढ होण्यासह मानसिक सक्षमता व खिलाडू वृत्तीचा विकास होतोअसे श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात क्रीडा स्पर्धातंत्र प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सव 2020 चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अस्पा बंडसन्स ऑटोचे संचालक उद्योजक रणजीत बंडजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळेसहायक संचालक नरेंद्र येतेप्राचार्य मंगला देशमुखउपप्राचार्य आर. जी. चुलेटश्रीमती एम. आर. गुढेपी. जी. कुमरेनिदेशक बोधराज काळे आदी यावेळी उपस्थित होते.
                   श्री. बंड म्हणाले कीखेळांत हारजीत होतच असते पण प्रत्येकवेळी जिंकण्याच्या निर्धाराने खेळायचे असते. विद्यार्थ्यांत विजिगिषु वृत्तीचा विकास खेळांतून होतो.
स्पर्धेत व्हॉलीबॉलकबड्डीक्रिकेट आदी क्रीडा प्रकारांत जिल्ह्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्याशिवाय खो- खो व लांब उडीउंच उडीधावणे आदी वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले. उद्या (3 जानेवारी) तंत्र प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असूनत्यात विविध तंत्र शाखांचे अभिनव अविष्कार सादर केले जाणार आहेतअशी माहिती प्राचार्य श्रीमती देशमुख यांनी दिली.
संस्थेचे शिल्प निदेशक रवींद्र दांडगेअनिल रेड्डीवारएस. एस. गोरेएस. एल. वानखडेएस. एस. पाटबागेए. एम. मेश्रामवाय. बी. देशपांडेजी. पी. मसरामव्ही. आर. पडोळेएन. आर. कथलेके. डी. फुटाणेआर. जे. नेमाडेजे. आर. झेगेकरजी. व्ही. चोपडेएम. आर. गुढेडी. एच. गुरव आदी उपस्थित होते. सुमेधा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुमरे यांनी आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...