प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे



अमरावतीदि. 7 – भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2020 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले.
        याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अधीक्षक गजेंद्र मालठाणेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमपोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. व्यवहारे म्हणाले कीप्रजासत्ताक दिनी सर्व शाळांनी सकाळी साडेसहा वाजता प्रभातफे-या काढून मुख्य समारंभासाठी वेळेपूर्वी पोहोचावे. अधिकाधिक लोकांना या समारंभास उपस्थित राहाता यावेयासाठी यादिवशी सकाळी 8.30 ते सकाळी 10 या वेळेत इतर कार्यालयसंस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. असे समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावेत.
ते पुढे म्हणाले कीकार्यक्रमासाठी स्वागत व समन्वय समितीध्वजवंदन संचालन व मैदानावरील कार्यक्रम समितीसांस्कृतिक कार्यक्रम समिती आदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. ध्वजवंदन संचलनसामूहिक कवायतमैदानावरील कार्यक्रमचित्ररथआवश्यक सराव यादृष्टीने नियोजनपूर्वक कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फर्निचरस्वागतद्वार उभारणीसजावटीच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्थाआवश्यक स्वयंसेवकध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी. महापालिकेकडून स्वच्छतापेयजल सुविधामुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खाऊवाटप आदी व्यवस्था पुरविण्यात यावी.
                        सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 7 वाजता वनिता समाज येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असूनशिक्षण उपसंचालक हे आमंत्रक असतील. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यथोचितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. व्यवहारे यांनी दिले. कार्यक्रमापूर्वी रंगीत तालीम 24 जानेवारीला 4 वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती