पालकमंत्र्यांच्या हस्ते वैदर्भी मार्टचा शुभारंभ








अमरावती, दि. 26 : उमेद अर्थात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘वैदर्भी मार्ट’ हे स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.
विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह गटांचे प्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  
खादी ग्रामोद्योग कार्यालयांतर्गत कस्तुरबा खादी समितीसह विविध 35 स्वयंसहायता समूहांची उत्पादने या दालनात उपलब्ध असतील. कपडे, खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू आदी विविध उत्पादनांचा त्यात समावेश आहे.
या उपक्रमामुळे स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे विपणन मजबूत व्हायला मदत होईल, तसेच अधिक रोजगारनिर्मितीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह उत्पादनांच्या गुणवत्तावाढीसाठीही उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जाते.
विविध गटांच्या महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.
                              000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती