Friday, January 3, 2020

मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून विकासकामांचा आढावा शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे - मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश




अमरावतीदि. 3 – नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधव अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावेअसे निर्देश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगेपोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकरपोलीस अधीक्षक हरी बालाजीमनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह विविध विभागप्रमुखअधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या कीमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे. त्याची अंमलबजावणी गतीने करावी. गारपीट व अकाली पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करावेत. शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाशेततळेकृषी यांत्रिकीकरण योजनेतील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. वीजपुरवठ्यात नियमितता आणावी. पावसाने कोसळलेले खांब उभारणीचे काम गतीने करावे.
त्या पुढे म्हणाल्या कीजिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी. त्यासाठीचा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे कालावधीचे नियोजन करून पूर्ण करावी. विकासकामांची सद्यस्थिती व नियोजन याबाबत परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उपजिल्हाधिकारी अजय लहानेडॉ. नितीन व्यवहारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमकेजिल्हा उपनिबंधक संदीप जाधवजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरेजिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी  विजय चवाळेमहावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे  यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...