Wednesday, January 15, 2020

मोझरी येथून गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ - केंद्रीय जहाज बांधणी, रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय






महात्मा गांधीजी यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल, असे केंद्रीय जहाज बांधणी, रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज येथे सांगितले.
गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत से राष्ट्रपिता - मोझरी ते सेवाग्राम गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ श्री. मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे,जि. प. सदस्य गौरी देशमुख, शरद वानखडे, मोझरीचे सरपंच बबलू मकरमपुरे,संतोष महात्मे, गुरुदेव सेवा आश्रमाचे प्रकाश वाघ, जनार्दन बोथे, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, बालाजी पवार, सुरेखाताई ठाकरे, रघुनाथ वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. मांडवीय म्हणाले की, देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून गांधीविचाराचा प्रसार करण्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे, ही महत्वपूर्ण बाब आहे.
गाव समृद्ध होईल तर राष्ट्र समृद्ध होईल. स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन याबाबत गांधीजी यांनी दिलेली शिकवण आजही पथदर्शक आहे. ही शिकवण तरुणाईच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. या कार्यात पदयात्रेचा उपक्रम मोलाचा ठरेल.
गांधी विचाराच्या प्रसारासाठी आपण यापूर्वी पदयात्रा आयोजित केल्या. त्यातून प्रेरणा मिळून अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आज त्या भगिनी मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. पदयात्रेसह अनेक विधायक उपक्रमात योगदान देत आहेत, असेही ते म्हणाले.
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जात देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.श्रीमती ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून व

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...