राज्यमंत्री बच्चू कडू यांची जिल्हा रूग्णालयाला भेट



अमरावती, दि. 1 – राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन रूग्णालयाची पाहणी केली व रूग्णांची विचारपूस केली. त्यांनी आज बालगृह व वृद्धाश्रमालाही भेट दिली.
राज्यमंत्री श्री. कडू यांचे आज शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यावर स्थानिक विविध संस्था, कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. कडू यांनी इर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी शहीद स्मारकालाही भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यांनी होलिक्रॉस संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. वृद्ध नागरिकांना पुरणपोळी खाऊ घालून मनमोकळा संवाद साधला. त्यांनी बालगृहालाही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. बालगृहाच्या अधिष्ठाता सिस्टर कॅथरिन, सिस्टर सुरेखा, प्राचार्य सिस्टर निलन, सिस्टर रेवल, सिस्टर करूणा, सिस्टर रोशनी, सिस्टर निती जोरा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
            राज्यमंत्री श्री. कडू यांनी जिल्हा रूग्णालयात विविध वॉर्डांची पाहणी केली व रूग्णांशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कडू यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधत त्यांना पुरणपोळीही खाऊ घातली. रुग्णालयाच्या डिजीटल एक्सरे मशीनचा शुभारंभही यावेळी झाला. 
                                                            00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती