Saturday, January 18, 2020

पालक मंत्र्यांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी शाळेतर्फे हृद्य सत्कार









शाळेच्या संस्काराचा वसा घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवा
                                     -  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 18 : कामाप्रती सकारात्मकता, चांगुलपण, कष्टातील प्रामाणिकता व  सातत्य यांच्या आधारे कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते. या संस्काराची शिदोरी आम्हाला या शाळेने दिली. संस्काराचा हा वसा घेऊन आपणही विविध क्षेत्रांत यश मिळवा, अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज होलिक्रॉस हायस्कुलच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. 
येथील होलिक्रॉस इंग्लिश हायस्कुलच्या माजी विद्यार्थीनी असलेल्या श्रीमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य पुष्पा थॉमस यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता. 
शाळेच्या विविध आठवणी जागवत श्रीमती ठाकूर यांनी विद्यार्थीनिंशी दिलखुलास संवाद साधला. त्या म्हणाल्या की,  शालेय जीवनात विविध कौशल्य मिळवण्याची संधी असते. विद्यार्थिनींनी प्रत्येक कौशल्य शिकून घेतले पाहिजे. 
शाळेची माजी विद्यार्थिनी मंत्री झाल्याबद्दल शाळेतर्फे  गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थीनीसह शाळेतील प्रार्थनाही गायिली. 
यावेळी संस्थेच्या बालगृहाला भेट देऊन तेथील बालकांशी त्यांनी संवाद साधला. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...