फ्रेजरपुरा येथे लसिकरण शिबीराचे आयोजन जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांची लसिकरण शिबीराला भेट











फ्रेजरपुरा येथे लसिकरण शिबीराचे आयोजन

जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांची लसिकरण शिबीराला भेट

 

फ्रेजरपुरा बडी नगीना मज्‍जीद शादीखाना येथे कोविड १९  लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १८ वर्षावरील नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्‍यात आले होते त्‍याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी फ्रेजरपुरा येथे मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी या शिबीराला प्रत्‍यक्ष भेट दिली.

 

मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी यावेळी सर्व उपस्थित नागरीकांना लसिकरणासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. महानगरपालिकेच्‍या या लसिकरण केंद्रावरील कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्‍य बजावतांना आढळून आल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी यावेळी त्‍यांचे विशेष कौतुक केले. नागरीकांसोबत संवाद साधतांना त्‍यांनी आपली काळजी घेण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. या ठिकाणी पहिला डोज असणा-या महिला मोठ्या प्रमाणात होत्‍या. आशा वर्कर व समाजसेवक यांनी नागरिकांना डोज घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित केल्‍यामुळे या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस घ्‍यावी असे आवाहनही यावेळी त्‍यांनी केले.       

 

        लसीकरण मोहीम सुरु करण्‍यात आली असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

 

यावेळी नागरिकांनी लस घेवून या लसिकरण शिबीराला सहकार्य केले आहे. तसेच महानगरपालिकेने अमरावतीकरांचे लसिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल नागरिकांनी त्‍यांचे यावेळी आभार मानले. या शिबीरात १९० नागरिकांचे लसिकरण करण्‍यात आले.

 

यावेळी जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, डॉ.जयदिप देशमुख, प्रफुल चव्‍हाण, संध्‍या चरपे, आशा वर्कर, इस्‍माईल लालुवाले, सचिन डाके व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

 

  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती