Tuesday, September 18, 2018

दिलखुलास कार्यक्रमात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर



         मुंबईदि. 18 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या विषयावर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार  दि. 19 आणि गुरूवार दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली  दीक्षित यांनी  ही मुलाखत घेतली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी राज्यातील विविध विभागासाठी करण्यात आलेली निधीची तरतूद,  जिल्हास्तरावर उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी घेण्यात येणारी खबरदारीजनतेसाठी शुद्ध पाणी पुरवठादुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्नजलस्वराज्य कार्यक्रम तसेच वॉटरग्रीड योजना याविषयांची माहिती श्री. लोणीकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...