माळशिरस येथील नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी 53 कोटींचा निधी - सुधीर मुनगंटीवार



मुंबई, दि. 5: मौजे माळशिरस जिल्हा सोलापूर येथील प्रस्तावित नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलआमदार हनुमंत डोळसमाजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटीलवित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तलविधी व न्याय विभागाचे सचिव एन. जे. जमादार यांच्या सह सार्वजनिक बांधकामगृह विभागाचे अधिकारीमाळशिरस वकील संघटनेचे पदाधिकारीआदी मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस येथे सध्या अस्तित्वात असलेली न्यायालयीन इमारत 1964-65 मध्ये बांधण्यात आलेली आहे. सध्या या इमारतीमध्ये 1 जिल्हा व सत्र न्यायालय, 1 दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), 3 दिवाणी न्यायालये (कनिष्ठ स्तर) कार्यरत आहे.  वाढलेली लोकसंख्या पाहता अस्तित्वातील न्यायालयीन  इमारत न्यायालयाच्या कामकाजास अपुरी पडत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
प्रस्तावित नवीन न्यायालय इमारतीचे बांधकाम आराखडे  व अंदाजपत्रक  हे सन 2016-17 च्या प्रचलित दरसुचिवर आधारित आहेत ते अद्ययावत करून त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची मान्यता घ्यावी अशा सूचना ही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
याच बैठकीत मौजे जिंती तालुका करमाळाजिल्हा सोलापूर येथे पोलीस ठाणे उभारण्याबाबत ही चर्चा झाली. यासंदर्भातील प्रस्ताव पोलिस महासंचालक यांनी शासनास सादर केलेला आहे. हे पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी 1 कोटी 76 लाख 55 हजार 222 रु इतका खर्च अपेक्षित आहे.  वित्त विभागाने यासंदर्भात अधिकची माहिती मागवली आहे.  त्या प्रमाणे पोलीस महासंचालक कार्यालयात फेर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ही कार्यवाही वेगाने पूर्ण करावी अशा सूचना अर्थ मंत्र्यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती