Thursday, September 6, 2018

विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश असलेला लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित

 लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा कामगारभूकंप पुनर्वसनकौशल्य विकासमाजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. 
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहमहाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूतसंपादक सुरेश वांदिले,‍ विभागीय संपर्क अधिकारी वर्षा फडकेवरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकरमनीषा पिंगळेसहाय्यक संचालक मंगेश वरकड आदी उपस्थित होते.
या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षीशैक्षणिक क्रांतिचे जनकगाव तेथे शाळासामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाडॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनाशेतीपूरक कौशल्य प्रशिक्षणछत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...