आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संशोधनाची परंपरा उन्नत करणारा उपक्रम - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर






          अमरावती, दि. 29 : ज्ञान व संशोधनाची मोठी परंपरा भारतभूमीला लाभली आहे. ही परंपरा आय.ई.टी.ई. परिषदेसारख्या उपक्रमांतून उन्नत होईल, असे केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे सांगितले.
 आय.ई.टी.ई. च्या (द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स) 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री श्री. अहिर यांच्याहस्ते येथील प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही हा महत्वाचा कार्यक्रम अमरावतीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
 संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, युवराजसिंग चौधरी, नितीन हिवसे, अॅड. उदय देशमुख, गजानन काळे, रागिणीताई देशमुख, डॉ. चौधरी, डॉ. हुडा, डॉ. प्रशांत इंगोले, डॉ. अमोल बोडखे, डॉ. एम. एस. अली आदी उपस्थित होते. या परिषदेत चांद्रयान मोहिमेसह अनेक महत्वाच्या प्रकल्पातील संशोधक सहभागी झाले आहेत.
श्री.अहिर म्हणाले की, संशोधन हे देशाला पुढे नेत असते. त्यामुळे संशोधनाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांतून देश व समाजाचे हित साधले जाते. आविष्कार व संशोधनाची परंपरा परिषदेने समृद्ध केली आहे.
          डॉ. हुडा, पद्मश्री ले. कर्नल दिवाकर सेन, डॉ. टी. एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री डॉ. टी हनुमान चौधरी व आर. के. गुप्ता, के. लक्ष्मीनारायण, डॉ. एन. एच. कोरी यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निकु खालसा व प्रा. मैथीली देशमुख यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती