Thursday, September 6, 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत


             मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात 'स्क्रब टायफस आणि अन्य साथीचे रोग : असा करू मुकाबलाया विषयावर सार्वजनिक आरोग्य  व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
     राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाने उचललेली ठोस पाऊलेपावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नये म्हणून आरोग्य विभागाने घेतलेली खबरदारीस्वाईन फ्ल्यू,लेप्टोडेंग्यूस्क्रब टायफस या आजाराविषयी घ्यावयाची काळजीसाथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने घेतलतली खबरदारीविषाणूजन्य रोगांच्या अभ्यासासाठी उभारण्यात आलेली व्हॉयरॉलाजी प्रयोगशाळा याविषयाची माहिती डॉ. सावंत यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...