Monday, September 24, 2018

‘आपलं मंत्रालय’ सप्टेंबरचा अंक प्रकाशित




मुंबईदि. 24 : ‘आपलं मंत्रालयच्या सप्टेंबर अंकाचे प्रकाशन रोजगार हमी योजनामृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक श्री. डवले आहेत. यावेळी  संचालक  अजय अंबेकरशिवाजी मानकरसंपादक सुरेश वांदिलेकार्यकारी संपादक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.
मंत्रालयीन प्रत्येक अधिकारीकर्मचाऱ्याने हा अंक आवर्जून वाचावा आणि आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन श्री. डवले यांनी केले.
या अंकात गणेशोत्सवगौरीचा पारंपरिक खेळबैलपोळा याविषयीच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाची काही निवडक छायाचित्रे  हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे अनुभवकथाकवितांचाही अंकात समावेश करण्यात आला आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...