गिरगाव चौपाटीवर यंदा परदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यासपीठ महाराष्ट्रातील गणेशोत्सव देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचणार - पर्यटन मंत्री जयकुमार रावल


मुंबईदि. ४ :  राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसेच मुंबई महापालिका विशेष नियोजन करीत आहे. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी परदेशी पर्यटक आकर्षित व्हावेतयासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात परदेशी पर्यटकांना सहभागी होता यावे यासाठी गिरगाव चौपाटीवर खास व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. ३०० हून अधिक पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता असणारे हे व्यासपीठ असेल. यामुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सव देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचेलअसे पर्यटन मंत्री मंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गिरगाव चौपाटी येथे मंत्री श्री. रावल यांनी यासंदर्भात करण्यात येत असलेल्या नियोजनाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणालेजगातील अनेक पर्यटक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना चांगल्या पद्धतीने गणेश विसर्जन पाहता यावे यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. परदेशी पर्यटक हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. यासंदर्भात देश विदेशातील ट्रॅव्हल एजंटदेश विदेशातील पर्यटन कंपन्या आदींच्या मार्फत परदेशी पर्यटकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली आहे.  या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या हॉटेलपासून गिरगाव चौपाटीपर्यंत  ने - आण करणे याचेही नियोजन करण्यात आले आहे.  गणपती विसर्जन उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गेल्या वर्षी थायलंड देशातील १७५ पर्यटक उपस्थित होते. हे लक्षात घेता यावर्षी सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गिरगाव चौपाटी येथे तयार करण्यात येत असलेल्या व्यासपीठावर ३०० पर्यटकांची व्यवस्था करण्यात येत आहे. या पर्यटकांना शुद्ध पाणीअल्पोपहारफिरती स्वच्छतागृहेबससेवा यांसह इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील.  या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा एक आंतरराष्ट्रीय सोहळा म्हणून प्रस्थापित करण्याचा एमटीडीसी आणि मुंबई महापालिकेचा मानस आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोडमहापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती